आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटविश्व:मेडिकाे टी-20 चॅम्पियनशिपमध्ये सुयोग स्ट्रायकर्सने आयकॉन केले पराभूत

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडिको टी-20 चॅम्पियनशिपमध्ये सुयोग स्ट्रायकर्स संघाने शानदार विजय मिळवला. एमआयटी मैदानावर झालेल्या लढतीत सुयोगने आयकॉनला 5 गडी राखून मात केली. या लढतीत राजेश चौधरी सामनावीर ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आयकॉनने २० षटकांत ६ बाद १३० धाव उभारल्या. प्रत्युत्तरात सुयोग स्ट्रायकर्सने १९.१ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात संजय पठारे ११ व संतोष बनकर ८ धावांवर परतले. यष्टिरक्षक फलंदाज अविनाश मुकेने अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व १ षटकार खेचत नाबाद ६३ धावांची विजयी खेळी केली. संदीप सानपने १० धावा केल्या. मयुरने १४ धावांचे योगदान दिले. राजेश चौधरी २ धावांवर नाबाद राहिला. संघाला २० धावा अतिरिक्त मिळाल्या. आयकॉनच्या विनोद यादवने २ आणि उमेद खान, अभिजित खत्री, खालेद कादरीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

बियाबाणीचे अर्धशतक व्यर्थ

तत्पूर्वी, आयकॉनची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मो. कलिम १४ व खालेद कादरी १ धावांवर परतले. त्यानंतर आलेल्या एमआर एकनाथने ५१ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचत ४५ धावा केल्या. कर्णधार आसिफ बियाबाणीने अर्धशतक झळकावले. मात्र, संघाच्या पराभवामुळे त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने ३७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार मारत ५१ धावा ठोकल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. केदार दिक्षीत व महेश जाधव भोपाळाही फोडू शकला नाही. सुयोगकडून राजेश चौधरीने २१ धावांत ३ गडी बाद केले. परवेझ बॉड व लक्ष्मण सूर्यवंशीने प्रत्येकी एकाला टिपले.