आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:क्रिकेटपटू भूषण नावंदेची विजय हजारे ट्रॉफीच्या संभाव्य संघामध्ये निवड

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे विजय हजारे ट्रॉफीसाठी संभाव्य संघाच्या शिबिरासाठी औरंगाबादचा युवा क्रिकेटपटू भूषण नावंदेची निवड झाली आहे. पुणे येथील आंतरराष्ट्रीय एमसीए क्रिकेट स्टेडियम गहुंजे येथे विजय हजारे ट्रॉफीचे सराव शिबिर चालू आहेत. या शिबिरातून महाराष्ट्राच्या अंतिम संघाची बीसीसीआयच्या स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, अंकित बावणेसारखे दिग्गज खेळाडूदेखील आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीसुद्धा संभाव्य संघात भूषणची निवड झाली होती. भूषण हा व्हिजन क्रिकेट अकादमीचा खेळाडू आहे. तो ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...