आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:न्यायालयात आरोपींचे फोटो काढणाऱ्या तरुणावर गुन्हा ; पोलिसांची कॉलर पकडून हुज्जत घातली

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनावणीसाठी हर्सूल कारागृहातून न्यायालयात नेल्यानंतर वीस वर्षीय तरुणाने अचानक पोलिसांसोबत असलेल्या आरोपींचे छायाचित्र काढणे सुरू केले. पोलिसांनी त्याला हटकले असता त्यांची कॉलर पकडून धिंगाणा घातल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. अफसर खान सत्तार खान (२०, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव असून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार सुभाष भोसले यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी कारागृहातील आरोपी मुकेश सुखबीर लाहोट, संतोष प्रभाकर नरवडे आणि शेख अफरोज शेख गुलाब यांना ताब्यात घेत ११.३० वाजता न्यायालयात हजर केले. दुपारी तीन वाजता अचानक एक तरुण त्यांच्यासोबत असलेल्या तिघांचे मोबाइलमध्ये छायाचित्र काढू लागला. भोसले यांनी त्याला हटकले असता पोलिसांची कॉलर पकडून हुज्जत घातली. त्याला ताब्यात घेताच त्याने मोबाइल तत्काळ मित्राकडे दिला.

बातम्या आणखी आहेत...