आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येपूर्वी भिंतीवर लिहून ठेवला मजकूर:तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी सख्खा भाऊ, भावजयीवर गुन्हा

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडीतील रहिवासी अविनाश सपकाळ यांनी ४ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी शनिवारी त्यांचा सख्खा भाऊ मनोज मोहन सपकाळ (३०) व त्याची पत्नी (भावजय) शीतल (२२) वर हर्सूल पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अविनाश यांनी आत्महत्येपूर्वी माझ्या मरणाचे कारण शीतल व मनोज असल्याचे भिंतीवर मार्कर पेनने लिहिले होते. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अविनाश यांची पत्नी स्वाती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीर जवळच राहत होते.

मात्र, छोट्या कारणांवरून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यामुळे मनोजच्या पत्नीने अनेकदा मारहाण केली होती. दिवाळीदरम्यान स्वाती त्यांच्या अजिंठा गावी गेल्या होत्या. मात्र, २ नोव्हेंबर रोजी मनोज व शीतलने अविनाश घरात असताना फटाके फोडले हाेते. हा प्रकार अविनाश यांनी स्वाती यांना कॉल करून सांगत असताना भावानेच मला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले होते. त्या तणावातून अविनाश यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी भिंतीवर आणि रजिस्टरमध्ये मजकूर लिहून ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...