आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पत्नीचा खून करून जाळून टाकणाऱ्या पतीविरुद्ध कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारामध्ये पत्नीचा खून करून जाळून टाकणाऱ्या पती विरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. २२ खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील झरा येथील नानाराव भुरके यांची मुलगी संगीता हिचा विवाह तीन वर्षापुर्वी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रामा बाबुराव मारकळ याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन अपत्ये ही झालीत दोन महिन्यापूर्वी संगीता मारकळ यांना मुलगीही झाली. मात्र मागील काही दिवसांपासून रामा मारकळ हा संगीता यांना त्रास देऊ लागला. तुला स्वयंपाक येत नाही चांगली नाही यासह इतर कारणावरून तो बोलत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून दररोजच कुरबुरी होत होत्या. यामुळे रामा याने संगीता यांना खून करण्याची धमकीही दिली होती.

दरम्यान गुरुवारी ता. २१ सायंकाळच्या सुमारास पांगरा शिंदे शिवारातील नाल्यामध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरात माहिती घेतली असता सदर मृतदेह संगीता रामा मारकळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर रामा यानेच संगीताचा खून केल्याचे स्पष्ट होऊ लागले होते. या प्रकरणात पोलिसांनी रामा मारकळ यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. या चौकशी मध्ये त्याने संगीता यांचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी नानाराव भुरके यांच्या तक्रारीवरून रामा मारकळ याच्याविरुद्ध कुरूंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...