आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:हिमायतबागेत शेड ठोकणाऱ्यावर गुन्हा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमायतबागेची चतुःसीमा निश्चित करून अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पत्र्याचे शेड टाकून जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेल्या शेख जाकेर शेख नासेर (रा. रोजाबाग) याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डाॅ. मोहन पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली हाेती. फळ संशोधन केंद्राच्या अधिपत्याखाली ३१५ एकर जमीन आहे. त्यापैकी गट क्रमांक २२ मध्ये दक्षिण बाजूने जाकेरने पत्र्याचे शेड उभारले होते.

बातम्या आणखी आहेत...