आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रास:वडिलांच्या आत्महत्येचा पत्नीसह मुलांवर गुन्हा ; सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारेश्वर आश्रमशाळेतील अधीक्षक पुंडलिक जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी व दोन मुलांसह सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. त्यांनी २० ऑगस्टला वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुंडलिक यांच्या आई-वडिलांना घरी सोबत राहण्यास विरोध केला होता. शेंद्रा परिसरातील एक प्लॉट त्यांनी वडिलांच्या नावे केल्याने पत्नी छाया, मुलगी व मुलासह सासू-सासऱ्यांनी त्यांना त्रास देऊन भागवत यांचे नाव काढून स्वत:चे नाव लावण्यास भाग पाडले. त्यानंतर १९ ऑगस्टला पत्नीने त्यांच्याविरोधात बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळेे तणावग्रस्त पुंडलिक यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी तक्रारीत केला आहे.

बातम्या आणखी आहेत...