आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:कुंड्या चोरणाऱ्यांवर गुन्हा ; सिडको एन-1 भागातील सायकल ट्रॅकवर सुशोभीकरणासाठी ठेवलेल्या झाडांच्या कुंड्या

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन-१ येथील रस्त्यावर पादचारी मार्गासह सायकल ट्रॅक तयार करून बाजूला कुंड्या लावल्या आहेत. या कुंड्या चोरून नेणाऱ्या दांपत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तपास केल्यानंतर फोटोत दिसणारी बजाज पल्सर दुचाकी विकास थोटे याच्या नावावर असल्याचे समोर आले. या मार्गावरील बहुतांश कुंड्यांची चोरी झाली आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या वतीने एमआयडीसी सिडको ठाण्यात कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक वस्तूंची चोरी, नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...