आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यीकरण:शहरात घाण पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनिमित्त शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सौंदर्यीकरण सुरू आहे. त्यामुळे आता रस्त्यावर थुंकणारे, परवानगी न घेता पोस्टर, बॅनर किंवा झेंडे लावणारे, अतिक्रमण करणारे, दुभाजकातील झाडे, सार्वजनिक रस्त्यांवरील रोषणाई, ग्लो गार्डन, कारंजे आदींचे नुकसान करणाऱ्यांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास फौजदारी कारवाईही करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे. जी-२० राष्ट्रसमूहाच्या महिला प्रतिनिधींची बैठक महिनाअखेर शहरात होणार आहे. या बैठकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. ५० कोटींतून मुख्य रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, चौकांचे सुशोभीकरण, फुटपाथची कामे, दुभाजकांमध्ये मोठमोठी झाडे लावणे, उड्डाणपुलांवर रोषणाई करणे आदी कामे सुरू आहेत.

नियमितपणे साफसफाई
रस्त्यांवर नियमितपणे साफसफाई, दुभाजकांलगतची माती उचलणे, मोठमोठे स्वागत फलक लावण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचा चेहरा बदलत आहे. हा बदल कायम राहावा यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...