आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता:सराफाला लुटणाऱ्या टोळीचा गुन्हेगार अटकेत ; टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराफा व्यापाऱ्याला काटशेवरी फाटा ते जटवाडा घाटातील पेट्रोल पंपाजवळ अडवून मारहाण करत चौघांनी लुटले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी लूटमार करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई १३ जून रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे करण्यात अली. नितीन कल्याण ससाणे (२४, रा. बंबाटनगर, रेल्वे पटरीच्या पलीकडे, मुकुंदवाडी) असे अटकेतील लुटारूचे नाव असून तो मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. शैलेश एकनाथराव टाक (२३, रा.सारा वैभव, जटवाडा रोड) यांचे काटशेवरी फाटा येथे कार्तिकी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास टाक हे दुकान बंद करून दुचाकीने (एमएच २१ बीएम ११०१) घराकडे जात होते. तेव्हा अचानक दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्याच्या दुचाकीस धडक देऊन त्यांना पाडले. त्यानंतर चौघांनी शैलेश टाक यांना मारहाण करत त्याच्याजवळील जवळपास १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ४ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, एकदाणी, अंगठी, सोन्याचे पेंडल व इतर दागिने हिसकावून पोबारा केला होता. यातील मोहरक्या सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (२५, रा. न्यू गणेशनगर, भारतनगर मनपा शाळेजवळ, गारखेडा परिसर) याला गुन्हे शाखेने २८ फेब्रुवारीलाच अटक केली होती. मात्र, त्यातील अन्य तिघे फरार होते. सोमवारी नितीन ससाणे पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फौजदार रमाकांत पटारे, शेख हबीब, जमादार विजय निकम, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, नितीन देशमुख, संदीप सानप यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...