आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री सत्तारांनी दिल्या सूचना:पीक विमा कंपन्यांनी पाच दिवसांत उरलेले पाच लाख सर्वेक्षण पूर्ण करून भरपाई द्यावी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याबाबत ५१ लाख तक्रारी पीक विमा कंपन्यांकडे केल्या आहेत. त्यामध्ये ४६ लाख तक्रारींबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाच लाख सर्वेक्षण पाच दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. पाच दिवसांत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ टक्के नुकसानीची १५१८ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा सूचना त्यांनी पीक विमा कंपन्यांना दिल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्तालयात पीक विमा कंपन्यांची राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली.

या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे तसेच व्हीसीद्वारे सर्व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे सहसंचालक कृषी अधीक्षक यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांना अनेकदा कमी रक्कम मिळते. त्यामुळे कंपन्यासह शासनाची बदनामी होते. त्यामुळे कोणत्याही कंपनीने भरपाई देताना एक हजार रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई देऊ नये अशा सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...