आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिनाम सप्ताहाची आज सांगता होणार:भद्रा मारुती मंदिरात रात्री 12 पासून दर्शनासाठी गर्दी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात रात्री १२ वाजेपासून दर्शनासाठी सुरुवात झाली असून मारुतीरायाची पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान पूजा-अर्चा होणार आहे, अशी माहिती भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठू बारगळ यांनी दिली. जिल्हाभरातून भक्त भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी पायी येतात. दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपासून उघडण्यात आले. पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान पूजा-अर्चा होईल. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भक्तांच्या उपचारासाठी डॉक्टरांची टीमही तैनात करण्यात आली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता होणार आहे.