आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसंख्या कमी होती आणि सर्व काही व्यवस्थित होते, तेव्हा भारतातील सर्वात गजबजलेल्या मुंबईचे सर्वात गजबजलेल्या अंधेरी उपनगरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करण्यासाठी सामान्य दिवशी ४५ मिनिटे लागत असत. कालांतराने बेकायदा बांधकामे, रस्त्यावरील पार्किंग आणि रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे हेच सात किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी १ तास २० मिनिटे लागू लागली. मुंबई ते भोपाळ प्रवास करण्यासाठी विमानाने लागणाऱ्या वेळेपेक्षा हे १५ मिनिटे जास्त आहे. ज्यांना प्रश्न पडतो की एकाच भूभागाला पूर्व आणि पश्चिम कसे विभागले गेले, त्यांना सांगू इच्छितो की, रेल्वे रूळ मध्यभागी असतात व त्या आधारावर दोन्ही दिशा ठरवल्या जातात. या सोमवारपासून पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वे मार्गावरील गोखले पूल बंद करण्यात आला, त्यामुळे मुंबई ते दिल्ली विमानाला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ (२.१० तास) लागला! रेल्वे रुळांवर नवीन पूल बांधण्यापूर्वी सध्याचा पूल पाडणे आवश्यक होते. पुलाखालून १२ ट्रॅक आहेत व २४ तासांत १ मिनिट असा नाही की त्यांपैकी एकावरून तरी रेल्वे जात नसेल. अशा स्थितीत मुंबई-रेल्वेंच्या जीवनवाहिनीशी छेडछाड न करता पूल पाडणे आव्हान ठरले. काही काळ रेल्वे सेवा बंद ठेवली तरच हा पूल पाडता येईल. यासोबतच वरून जाणाऱ्या विद्युत तारांनाही संरक्षण देणे आवश्यक होते, जेणेकरून दुर्घटना घडू नये. २०२३ च्या पावसाळ्यात इथला प्रवास अधिक कठीण होणार असल्याने आधीच त्रासलेल्या मुंबईकरांनी शहराच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करावा व नवीन पुलाच्या बांधकामाला अधिक गती द्यावी, असे आवाहन केले. एकीकडे लोकांमध्ये याची चिंता आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाशी संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे या दोन प्रमुख यंत्रणा पूल तोडण्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगून टाळाटाळ करत आहेत. आता स्थानिक रहिवासी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून मतभेद संपवण्याची विनंती करत आहेत. थोडक्यात, वाहतूक समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी देशातील उदयोन्मुख शहरांसमोर या महानगराची प्रतिमा डागाळली आहे. १.६ कोटी लोकांच्या गरजा शेवटी महानगर कसे पूर्ण करू शकते हे पाहण्यासाठी ते मुंबईकडे आशेने पाहतात.
हे केवळ मुंबईचेच नाही, तर दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद या सर्व महानगरांच्या गर्दी व्यवस्थापन व्यवस्थेत गडबड आहे. एजन्सी सर्वसामान्यांची चेष्टा करून, त्यांच्यावर दोषारोप करून जबाबदारीपासून पळ काढत असतात. अशा शहरांमध्ये आपण अनेकदा ऐकतो की, इथे ट्रॅफिक सर्वात वाईट आहे. ही शहरे ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्कीच योग्य नाहीत, ज्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. लक्षात ठेवा, भारतातील सर्वाधिक मुलांचा जन्म १९६४ पूर्वी झाला होता आणि त्यांचा ६० वा वाढदिवस जवळ येत आहे. आपण त्यांचे जीवन सुखकर करू शकत नाही तर आपण कसले प्रशासन चालवत आहोत? शहराच्या संस्कृतीनुसार गर्दी व्यवस्थापनाचे धडे रोज बदलतात. या उदयोन्मुख समस्या सोडवू शकतील अशा तरुणांची आपल्याला गरज आहे. तिरुपती, शिर्डी, वैष्णोदेवी, सिद्धिविनायक या धार्मिक स्थळांवरील तरुणांना प्रशिक्षित केले पाहिजे, जेणेकरून े येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी त्यांना तयार करता येईल. अन्यथा, गर्दीच्या दबावाखाली एकामागून एक शहरे उद्ध्वस्त होत जातील.
फंडा असा ः व्यवस्थापन-महाविद्यालयांनी देशातील नागरी संस्थांशी चर्चा करून त्यांच्या अभ्यासक्रमात क्राउड मॅनेजमेंटचा समावेश करावा, जेणेकरून तरुणांना येणाऱ्या काळातील समस्यांना तोंड देता येईल. भविष्यात अशा तरुणांना खूप मागणी असणार आहे.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.