आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:ढगांची गर्दी, तरी मोठ्या पावसाला हुलकावणी ; दुपारनंतरच्या गारव्यामुळे उकाड्यापासून दिलासा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी सकाळच्या सत्रात सूर्य चांगलाच तळपला. उष्म्याने लोक घामाघूम झाले होते. दुपारी २ वाजेनंतर आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासात तर ढगांच्या छायेने काही वेळ अंधार पसरून मेघगर्जनेला सुरुवात झाली. मोठा पाऊस पडणार असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे लोकांची आश्रय शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. ग्रामीण भागात धो-धो पाऊस पडला, तर शहरात रात्री ८ वाजेपर्यंत मोठ्या पावसाला हुलकावणी मिळाली. जेथे पोषक वातावरण तयार होते तेथेच पाऊस पडतोय. यामुळे गारवा सुटला होता. परिणामी उकाड्यापासून दिलासा मिळाला. १५ मार्च ते ३१ मेपर्यंत ५८ दिवस आणि जूनचा पहिला आठवडा सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांपर्यंत तापमान जास्त राहण्याचा विक्रम झाला आहे. यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवले होते. मात्र, हवामान बदलामुळे मान्सूनच्या आगमनात अडथळे निर्माण झाले. शहर व परिसरात मान्सूनपूर्वचा पहिला पाऊस गुरुवारी पडला. ६.६ मिमी पहिल्या पावसाची नोंद झाली. शुक्रवारी मान्सूनचे मुंबईच्या वेशीत आगमन झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जोरदार मृगधारा बरसल्या. शहरावर ढगांची चादर पसरली होती. हलका पाऊस पडला. येत्या दोन ते चार दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...