आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी होत आहे. सध्या सुट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक बीबी का मकबरा पाहण्याचा आनंद लुटत आहेत. गेल्या शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत ८ हजारांवर पर्यटकांनी मकबऱ्याला भेट दिल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली. कोरोनामुळे गत दोन वर्षे पर्यटकांवर निर्बंध आले होते. पर्यटनस्थळे बंद होती. कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा पर्यटनस्थळे खुली झाली आहेत. मात्र, तीव्र उन्हाच्या झळांनी गत दोन महिने पर्यटकांना बाहेर फिरण्यावर गदा आणली होती. उन्हाची तीव्रता कायम असली तरी सुटीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मकबऱ्याला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मकबरा म्हणजे मिनी ताज : औरंगजेबाची बायको रबिया उद दुर्राणी ऊर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बीबी का मकबरा बांधला, असे म्हटले जाते. ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि यामुळेच मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखले जाते. आग्र्याचा ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो अगदी तशीच भावना मकबऱ्याला पाहून पर्यटकांच्या मनात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.