आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय लढ्यापेक्षा सांस्कृतिक लढा महत्त्वाचा असून यातून मूलभूत बदल घडताना दिसतात. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे सांस्कृतिक भूमिका घेऊन ठामपणे लढा उभारावा, अन्यथा ब्रिटिशपूर्व काळातील जीवन बहुजनांच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश सिरसाट यांनी केले. प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रा. अविनाश डोळस यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी ‘दलित नाट्य परिषद व नाट्यचळवळ : चिंतन शिबिरातून ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या या शिबिराला अंकुश भालेकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. उत्तम अंभोरे, प्रा. भारत सिरसाट, सिद्धार्थ आलटे, प्रा. विजया शिरोळे, डॉ. मधुकर खंडारे, मंगल मून, प्रकाश इंगळे, अमरदीप वानखडे, धनराज गोडाने, रतनकुमार साळवे, डॉ. सागर चक्रनारायण, डॉ. यशवंत खडसे उपस्थित होते. “दलित नाट्यचळवळीची भूमिका’ या पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ. संजय मून होते. ते म्हणाले की, दलित रंगभूमी निर्मितीमध्ये अविनाश डोळस यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे. या सत्राचे सूत्रसंचालन व आभार डॉ. प्रज्ञा साळवे यांनी केले.
दुसऱ्या सत्रामध्ये “दलित नाट्यचळवळ : वाटचाल, सद्य:स्थिती व अपेक्षा’ विषयावर डॉ. प्रभाकर शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्ये प्रकाश त्रिभुवन, देविदास मनोहरे, अशोक गायकवाड, अमोल खरात, प्रज्ञा जाधव आदींनी सहभाग घेतला.
फुले-आंबेडकरांचे परिवर्तनशील विचारच रंगभूमीला अपेक्षित तिसऱ्या सत्रामध्ये “दलित नाट्यचळवळ गतिमान करण्यासाठी कृती कार्यक्रम’ विषयावर मधुसूदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्ये विलास गवळी म्हणाले, फुले-आंबेडकरांच्या परिवर्तनशील विचारच सर्वांनी स्वीकारून,सामाजिक बांधिलकी स्वीकारल्याचे सिद्ध होते. दलित रंगभूमीला अपेक्षित असलेली हीच वैचारिक क्रांती होय. आभार डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.