आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएरवी मुलांना चॉकलेट खाऊ नका, भिंतीवर लिहू नका, अभ्यास करा, खेळू नका...अशा सूचनांचा भडिमार करताना पालक दिसतात. मात्र, मुलांना त्यांच्या वयानुसार हसू-खेळू दे. खूप खूप बागडू दे. असे आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी चक्क पहिलीच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात बदल करण्यात आलाय. यंदापासून बालभारतीच्या एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकात हा बदल पाहायला मिळेल. त्यात विद्यार्थ्यांना नाटक बसवा, अभिनय करा, चित्र काढा आणि चित्र रंगवा, हसत - हसत खेळा, पण मैदानावर मनमुरादपणे बागडा अशी साद घातलीय.
मोफत पाठ्यपुस्तके
दरवर्षी समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. बालभारती मार्फत या पाठ्यपुस्तकांचे वितरण मागणीनुसार तालुकास्तरावर करण्यात येते. यंदा देखील पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत मिळावे, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, शंभर टक्के वितरणही केल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: पहिली आणि दुसरीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार होता. परंतु कोरोना परिस्थितीमुळे ते होवू शकेल नव्हते. यंदा मात्र पहिलीच्या पाठ्युपस्तकातील रचनेेत बदल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांचा प्रयोग आता जिल्हाभर करण्यात येत आहे. ज्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यातत आले असून, पहिल्या सत्रासाठी दोन आणि दुसऱ्या सत्रासाठी दोन असे चारच पाठ्यपुस्तक करण्यात आले आहे. ज्यात मुलांना चित्रे आणि कृतीतून शिकता येणार आहे. याबरोबरच संस्कार, स्वयंशिस्त, नियमांचे पालन, मुलांना आवडणारे खेळ, नाटक, अभिनय या मुद्द्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
अशी आहे आकडेवारी
औरंगाबाद मनपा ७ लाख २१ हजार ६५०, जिल्हा परिषद १७ लाख ६६ हजार ६९९ तर हिंगोली ७ लाख ५६ हजार ८०३, बीड १८ लाख ६७ हजार ३९६, जालना जिल्ह्यात १९ हजार ६२८ पाठ्यपुस्तकांचे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.
शंभर टक्के पुस्तकांचे वितरण
बालभारतीच्या वतीने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळावे यासाठी सर्व पुस्तकांचे असे एकूण ६१ लाख ३२ हजार १७६ पाठ्युपस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.
- एस. एम. पवार, भांडार व्यवस्थापक, बालभारती
विद्यार्थ्यांच्या वयानुसार शिक्षण
विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार शिक्षण मिळावे असा विचार करण्यात आला आहे. चित्रांचा खूप छान पद्धतीने वापर करण्यात आला आहे. इंग्रजी, मराठी आणि उर्दू असे तिन्ही माध्यम पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. दप्तराचे ओझे कमी केले आहे.
- सुरेश परदेशी, मुख्याध्यापक, मुकुल मंदिर प्रशाला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.