आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Curriculum Cuts And Extended Time Came Kami, Amravati Division Ranked Third In The State For The Second Time In Four Years; Konkan Division First In The State With 97.21% Result

बारावी निकाल - कोकण विभाग राज्यात प्रथम:अभ्यासक्रमातील कपात आणि वाढवून दिलेला वेळ आला कामी, राज्यात अमरावती विभाग चार वर्षांत दुसऱ्यांदा तिसऱ्या क्रमांकावर; 97.21% निकालासह कोकण विभाग राज्यात प्रथम

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या निकालात राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त करून अमरावती विभागाने या वर्षी एक नवा विक्रम साध्य केला आहे. विशेष असे की गेल्या चार वर्षांत अमरावती विभागाच्या वाट्याला दुसऱ्यांदा हे यश प्राप्त झाले. अमरावती विभागाचा या वर्षीचा निकाल ९६.३४ टक्के आहे. ९७.२१ टक्के निकालासह कोकण विभाग राज्यात प्रथम असून विदर्भातीलच नागपूरने दुसरे स्थान प्राप्त केले.

परीक्षेतील प्रत्येक विषयासाठी वाढवून मिळालेली वेळ, त्याच वेळी कमी केलेला अभ्यासक्रम आणि दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा होत असल्याचे भान ठेवून विद्यार्थी, शिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे निकालाची टक्केवारी वाढली, असे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले. त्यांच्या मते विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून या वर्षी ज्या महाविद्यालयातून ते शिकले त्याच महाविद्यालयात परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर ताण आणि दडपण कमी आले. त्याचाही फायदा निकाल वाढण्यासाठी झाला असावा, असे त्यांचे निरीक्षण आहे.

चार वर्षांत दुसऱ्यांदा यश
सन २०१९ मध्येही अमरावती विभाग तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या वर्षी अमरावती विभागातील ८७.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गतवर्षीचा अंतर्गत मूल्यमापनाचा अपवाद वगळता त्या वर्षीची बारावीची परीक्षा ऑफलाइनच झाली होती. त्या वर्षीसुद्धा ९३.२३ टक्के निकालासह कोकण विभाग प्रथम तर ८७.५५ टक्के निकालासह अमरावती विभाग तिसऱ्या क्रमांकावर होता. पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के लागल्याने तो विभाग दुसऱ्या क्रमांकावर होता

बातम्या आणखी आहेत...