आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण कापले; 215 परीक्षकांना नोटीस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना योग्य उत्तरे असूनही काही विद्यार्थ्यांचे गुण पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी कापल्याचे उघड झाले आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे ५ पेक्षा जास्त गुण वाढल्याचे समोर आले आहे. पेपर तपासणीत असे घोळ करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या जिल्ह्यातील २१५ परीक्षकांना बाेर्डाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचे मानधन कपात करण्यात येणार आहे, त्याशिवाय संबंधित शिक्षकांच्या शाळेत-कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही बोर्डाने दिल्या आहेत.

फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान स्टेट बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या. सुमारे दीड ते पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पण पेक्षित गुण न मिळालेल्या बारावीच्या ३५० व दहावीचे ३०० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. या फेरतपासणीत अनेक विद्यार्थ्यांच्या गुणात तफावत आढळून आली. त्यांचे गुण वाढवून देण्याची नामुष्की बोर्डावर ओढवली. एखाद-दुसरा गुण वाढला किंवा कमी झाला तर बोर्डाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र पाचपेक्षा जास्त गुण वाढले तर मात्र परीक्षकांवर कारवाई केली जाते. त्यानुसार यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील २१५ परीक्षकांना नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात आला आहे. त्यांच्या मानधनातही कपात केली जाणार आहे. यात दहावीचे पेपर तपासणाऱ्या ५७ तर बारावीचे तपासणाऱ्या १५८ परीक्षकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर या बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्रही बोर्डाने त्यांच्या शिक्षण संस्थांना पाठवून त्याबाबत बोर्डाला अवगत करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

किती मुलांवर अन्याय हे लपवले विद्यार्थ्यांचे गुण विनाकारण कमी करणाऱ्या किती शिक्षकांवर कारवाई केली हे जाहीर केले. मात्र शिक्षकांच्या या बेजबाबदारपणामुळे किती विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले होते, पुनर्मूल्यांकनात किती जणांचे गुण वाढले हे मात्र लपवून ठेवले. याबाबत ‘दिव्य मराठी’ने बोर्डाचे सहसचिव वाय.एस. दाभाडे यांच्याकडे विचारणा केली असता याबाबत इथल्या कार्यालयातून काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...