आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलिंग रायडींग स्पर्धा:निखिल कचेश्वर अमोघ जैन यांची 75 तासांत 1000 किमी सायकलिंग यशस्वी, 47 वा क्रमांक मिळवला

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील प्रसिद्ध सायकलपटू निखिल कचेश्वर व अमोघ जैन यांनी बंगळुरू येथील १००० किमी सायकलिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. या दोघांनी कठिण परिस्थितीचा सामना करताना ७४ तास ५७ मिनिटात १०११.५६ किमी अंतर पूर्ण केले. या ७५ तासादरम्यान त्यांनी अवघ्या ५ तासांची विश्रांती घेतली. या राइडमध्ये ९९ स्पर्धेक सहभागी झाले होते, मात्र ४७ जणांना ही स्पर्धा पुर्ण करतात आली. छत्रपती संभाजीनगरची टीम ४७ व्या स्थानावर राहिली. या स्पर्धेचा मार्ग बंगळुरू, दांडेली, खानापूर, कित्तूर, हुबळी, धारवाड व बंगळुरू असा होता.

सायकलच्या तांत्रिक अडचणी

सायकलिंग करताना ४० किमी अंतर पार केल्यानंतर निखिलच्या सायकलची चेन तुटली. जवळच सायकलचे दुकान सापडल्याने ती दुरुस्त करुन पुढील प्रवास केला. वेगवेगळे हवामान, चढउतार, प्रचंड वाहतुक अशा अनेक अडचणीनंतर सलग ३५३ किमी सायकलिंग केली. त्यानंतर थोडी विश्रांती घेत पुन्हा सायकलिंग सुरू केली. मानसिक व शारीरिक क्षमता पाहणारी ही राइड होती. साकारात्मक विचाराने दोघांनी सायकलिंग सुरू ठेवली होती.

थोडक्यात रस्ता हुकला

प्रवासादरम्यान ८२० किमी अंतरावर टायर पंक्चर झाले. जवळच पेट्रोल पंप असल्याने तेथे दुरूस्तीची सुविधा मिळाली. त्यामध्ये अर्धा तास वाया गेला. एका ठिकाणी मोबाइल पडल्याने जीपीएसला अडचण आली. त्यामुळे दोन्ही रायडर २ किमी रस्ता हुकले. एका महिलेने त्यांना मार्ग दाखवला. त्यामुळे दोघे वेळेत राइड पूर्ण करु शकले. अन्यथा उशिर झाला असता. बंगळुरूमध्ये प्रचंड ट्रॅफिक असल्याने त्यामध्ये वेळ जात होता. अखेरचे १३ किमी अंतर १ तास पूर्ण करत यश मिळवले. या दोघांना जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव चरणजीतसिंग संघा, अतुल जोशी, उन्मेश मारवाडे, गियर लायब्ररीचे नितीन घोरपडे, निखिल मिसाळ आदींची मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...