आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत तपासणी:किडनी दिनानिमित्त रविवारी सायकलिंग, धावण्याची स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

९ मार्च रोजी जागतिक किडनी दिन आहे. यानिमित्त सायक्लोथॉन, धावण्याची स्पर्धा, विविध खेळ, योगा आणि मानसिक आरोग्य अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे सुमन किडनी फाउंडेशनचे डॉ. सुहास बावीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रविवारी, ५ मार्च रोजी सुमन किडनी फाउंडेशन, उत्कर्ष हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, जेआयआययूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ँड रिसर्च आणि निझॉन ट्रेनिंग सिस्टिम यांच्या वतीने हे उपक्रम होणार आहेत.

अदालत रोड येथील समता दर्शन हॉल येथे सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. बदनापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मौलाना हुजेफा वस्तान्वी, अधिष्ठाता अझहर अहमद सिद्दिकी प्रमुख पाहुणे असतील. एमआयटीचे अध्यक्ष मुनीश शर्मा अध्यक्षस्थानी असणार आहेत. दोन, पाच आणि दहा किलोमीटर सायक्लोथॉन होणार आहे. सकाळी आठ वाजता अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने बीएमआय, किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण, किडनीचे चलनवलन चाचण्या करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...