आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैनिक भास्करचा नवा पुढाकार:आशेच्या पेंटिंगने नववर्षाच्या अंकाच्या मुखपृष्ठाचा भाग व्हा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय वाचक,
२०२० हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे आणि २०२१ बाबत विशेषत: मुले आणि तरुणांच्या मनात उज्ज्वल भविष्याच्या मोठ्या आशा आहेत. आशेचे हे रंग कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दैनिक भास्कर समूह एक नवा आणि अनोखा प्रयोग करत आहे. या अंतर्गत प्रथमच चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मुले व युवकांना दैनिक भास्करच्या (दैनिक दिव्य मराठी) नववर्ष विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आपली कला दाखवण्याची संधी दिली जात आहे.

११ वर्षाच्या मुलांपासून ते १८ वर्षाचे तरुण '२०२१ मध्ये आपल्या आशेतील भारत' या थीमवर सुंदर चित्र चितारून विजेते होऊ शकतात. विशेष ज्यूरीद्वारा निवडलेल्या चित्राला दैनिक भास्करच्या विशेषांकात प्रसिद्ध करण्यासोबतच प्रथम पुरस्कार म्हणून ५१ हजार रुपये दिले जातील. निवडलेल्या इतर चित्रांना ३१ हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार, ११ हजारांचा तिसरा, तर १ हजार रुपयांचे १० प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत बुधवार, २३ डिसेंबर २०२० आहे. भास्कर परिवार

स्पर्धेत भाग घेण्यासाठी ...
1) 91900-00073 वर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला SMS वर एक लिंक येईल. तिच्यावर क्लिक केल्यानंतर फॉर्म भरून पेंटिंग सबमिट करू शकता.
2) www.bhaskar.com किंवा https://divyamarathi.bhaskar.com/ वरही या स्पर्धेत भाग घेता येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser