आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादलित पँथरआधीचा काळ हा साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला, विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून पँथरच निर्माण झाले. त्यानंतर चार वर्षे मोठ्या ताकदीने काम केले. पँथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. जेथे अन्याय-अत्याचार व्हायचे तेथे पँथर जाणार हे कळताच प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा असा धाक पँथरचा होता. मात्र आयडियॉलॉजीमुळे पँथर बरखास्त करण्यात आली. पण दलित पँथर ही आग आहे, ती सहज विझत नाही, ती पिढ्यान््पिढ्या जळत राहणार, असे मत युवा लेखक अॅड. सूरज एंगडे यांनी व्यक्त केले.
दलित पँथरच्या पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल, पोलिस अधिकारी प्रवीण मोरे उपस्थित होते. एंगडे पुढे म्हणाले, ‘पँथरच्या माध्यमातून विषमतावादी लोकांच्या विरोधात लढे उभारण्यात आले. ते समाजाला सुधारण्याचे आंदोलन होते. तुम्ही समाजाला सुधारता तेव्हा तुम्ही देश सुधारण्याचे काम करत असता. त्यामुळे दलित पँथरचे पन्नासावे वर्ष अभिमानाने साजरे करणे गरजेचे आहे.’ तंबाखू, गुटखा यांसारख्या पदार्थांची जाहिरात करणारे आजच्या तरुण पिढीचे आदर्श कसे असू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक सतीश पट्टेकर यांनी, सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले.
पँथरने पीडितांना न्याय मिळवून दिला : मंडल पत्रकार दिलीप मंडल म्हणाले, ‘भारतीय दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. पँथरने कोट्यवधी पीडित लोकांना न्याय मिळवून दिला. सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या स्वप्नांची उंची वाढवणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती यासाठी अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.