आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक शास्त्रीय नृत्यातून पौराणिक कथा दाखवल्या जातात. त्या कथा आजच्या आधुनिक युगातही समर्पक संदेश देणाऱ्या ठरतात. नृत्य म्हणजे केवळ डोळ्याचे पारणे फेडणे नव्हे, तर ध्यानातील एक अवस्था आहे. याची प्रचिती देवमुद्रा नृत्य अकादमीच्या नृत्यसाधना उत्सवात आली. जागतिक नृत्य दिनानिमित्त देवमुद्रा अ मूव्हमेंट स्कूल संस्थेतर्फे “नृत्यसाधना” कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आहारतज्ज्ञ डॉ. अस्मी भट, फिजिओथेरपिस्ट डॉ. मृणाल कुलकर्णी, देवमुद्राचे ट्रस्टी सदस्य आ. अवतारसिंग सोदी, डाॅ. जयंत शेवतेकर यांची उपस्थिती होती.
भरतनाट्यम नृत्य प्रकारातील पुष्पांजली आणि गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कुचिपुडीत गणपती कौत्वम सादर झाले. देवीस्तुती आणि शिवस्तुतीने मने जिंकली. शहरातील नामवंत कथक आणि ओडिसी नृत्य कलाकार अजय शेंडगे यांनी ओडिसी नृत्य प्रकारातील मंगलाचरण आणि पल्लवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. तीन शास्त्रीय नृत्यकलांचा हा संगम रसिकांसाठी विलक्षण ठरला. आश्लेषा मगरे, ज्ञानदा साबदे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. सौम्याश्री यांनी आभार मानले.
नृत्यकला व्यक्तीच्या मन, बुद्धी आणि शरीराची मशागत करते. त्यामुळे नृत्यकला साधना म्हणून जोपासली पाहिजे, असा सल्ला डॉ. शेवतेकर यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.