आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:‘सुरक्षेचे नियम पाळल्यास धावताना धोके कमी’ ; तज्ज्ञांचे धावपटूंना मार्गदर्शन

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अपघात, दुर्घटना हे धोके जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहेतच. मात्र आपल्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा विचार करून, आवश्यक तपासण्या करून, उपाययोजना आणि सराव करावा. तसेच आपण कशासाठी धावतो आहोत, याबाबत आपल्या संकल्पना अगदी स्पष्ट असल्या तर धावण्यात धोके अतिशय कमी आहेत,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध धावपटू व कार्डियाक सर्जन डॉ. आनंद देवधर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद ब्लॅक बकतर्फे नोव्हेंबर महिन्यात दौलताबाद ते वेरूळ हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संघटनेतर्फे ‘लर्न बिफोर यू रन’ या संकल्पनेवर आधारित एका परिसंवादाचे हॉटेल मॅनॉर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्डियालॉजिस्ट डॉ. मिलिंद खर्चे आणि डायरेक्टर एमसीआरआय आयसीयू डॉ. आनंद निकाळजे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. धावणे, त्यासाठीच्या काळजी, तपासण्या, शारीरिक क्षमता, पूर्वतयारी, आहार, विश्रांती अशा विविध बाबींवर या तज्ज्ञांनी उपस्थित धावपटूंना मार्गदर्शन केले.

डॉ. देवधर यांनी सांगितले, की मॅरेथॉन धावताना दुर्घटना होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरच अतिशय नगण्य आहे परंतु अशा एखाद्या घटनेला विनाकारण खूप मोठी प्रसिद्धी दिली जाते. धावणे हे सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकते. मात्र त्यासाठी पुरेशी पूर्वतयारी, पूर्वतपासणी, शारीरिक क्षमता यांचा संपूर्ण आढावा प्रत्येक धावपटूने स्वतःच घेतला पाहिजे.

धावण्यापूर्वी आजारांची तपासणी करणे योग्य : खर्चे
डॉ. मिलिंद खर्चे यांनी, ‘धावताना अनेक विकार त्रास देऊ शकतात, त्यावर लक्ष द्यायला हवे. धावण्यापूर्वी प्रत्येकाने आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करवून घेतलीच पाहिजे. आधीपासून असलेल्या आजारांची आजची परिस्थिती आणि त्यावर उपचार याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. योग्य ती काळजी आधीच घेतली तर कोणताही धोका उद्भवणारच नाही. कोरोनानंतर शरीरात बदल झाले आहेत.’