आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्याने ५० वर्षांपूर्वी फुटबॉलमध्ये ७७ आंतरराष्ट्रीय गोल करत विक्रम केला होता. त्याने अब्जावधी लोकांचे लक्ष वेधून घेतले. या शुक्रवारपर्यंत कोणीही या विक्रमाच्या जवळपासही जाऊ शकले नव्हते. ज्यांनी हा विक्रम केला ते रुग्णालयात श्वसन संसर्गावर उपचार घेत होते. त्यांनी विक्रम मोडताना आणि आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले : “मी तुला पुढे जाताना पाहिले, तुला दररोज प्रोत्साहन दिले आणि आता मी शेवटी तुझे अभिनंदन करू शकतो की तू ब्राझीलसाठी केलेल्या माझ्या गोलची बरोबरी केली आहेस. मुला, तू यशस्वी झालास. तुझे कर्तृत्व किती मोठे आहे हे यातून दिसून येते. आपणा दोघांना माहीत आहे की, ते आकडेवारीपेक्षा मोठे आहे. एक खेळाडू म्हणून इतरांना प्रेरणा देणे हे आपले कर्तव्य आहे. आज तू सहकाऱ्यांना, पुढच्या पिढीला आणि आपल्या खेळावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना प्रेरणा दिली आहेस.’
त्यांनी शेवटी असेही लिहिले, ‘दुर्दैवाने आमच्यासाठी हा जास्त आनंदाचा दिवस नाही.’ कारण नेमारने खेळाच्या १०६व्या मिनिटाला पेलेच्या विक्रमाची बरोबरी केली, पण त्याचा देश दोहा येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. नेमारने क्रोएशियाच्या गोलकीपरला चकमा देऊन ८२ वर्षीय पेलेच्या विक्रमाशी बरोबरी करून त्याच्या उजव्या तळपायाचे मूल्य दाखवले, परंतु त्याचा देश क्रोएशियाकडून हरला. मात्र, नेमारचे वैयक्तिक स्वप्न साकार झाले असून आता पेले आणि नेमारचा विक्रम मोडणे हे जगभरातील नवोदित खेळाडूंचे स्वप्न असेल.
याच्या २४ तासांनी शनिवारी २१.४ कोटी ब्राझिलियन दुःखात होते आणि ४० लाख क्रोएशियन लोकांनी उपांत्य फेरी गाठल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तेव्हा मोरोक्कोनेही ३.७ कोटी देशबांधवांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. विश्वचषकातील आवडत्या पोर्तुगाल संघाला हरवून त्यांनी मोठा धक्का दिला. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो रडत ड्रेसिंग रूमकडे जाताना पाहून जगभरातील चाहत्यांना धक्काच बसला. उत्तर आफ्रिकन राष्ट्र मोरोक्को या मोठ्या संघाविरुद्ध धैर्याने, दृढनिश्चयाने आणि तांत्रिक कौशल्याने खेळले. ते अशा टप्प्यावर पोहोचले जिथे आजवर आफ्रिकन देश पोहोचला नव्हता. विश्वचषक उपांत्य फेरी. ९८ मिनिटांच्या संपूर्ण गेममध्ये अस्वस्थता कायम होती. यातील एकमेव गोल प्रत्येक फुटबॉल चाहत्याने आवर्जून पाहावा. चेंडू आधीच गोलपोस्टमध्ये होता, पण नेटपासून काही सेंटीमीटर दूर होता. पोर्तुगालचा गोलकीपर डिओगो कोस्टा, त्याचा सहकारी रुबेन डियाझ व मोरोक्कोचा युसेफ एन-नेसरी हे ३ खेळाडू हवेत २ ते ३ फूट उंच होते. नेसरीने डियाझवर झेप घेतली व कोस्टाला मागे टाकून गोल केला. संपूर्ण खेळात नेसरी ४ ते ५ फूट उडी उसळून डोक्याने चेंडू मारत राहिला. फेव्हरेट पोर्तुगालने चेंडूवर अधिक वेळ ताबा ठेवला, पण शेवटी गोल कोणी केला, हे महत्त्वाचे. मोरोक्कोने ते केले. त्यांनी देशाच्या सीमेप्रमाणे गोलपोस्टचे रक्षण केले. याचे श्रेय संपूर्ण संघाला जात असले तरी सामन्यातील सर्वात कठीण क्षणांमध्ये मोरक्कन गोलकीपर बोनो ठळकपणे चमकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.