आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचहाच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इंग्रजांच्या काळात विकसित दार्जिलिंग येथील चहा मळ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. निम्म्याहून जास्त मळे दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत चहा उद्याेगांवरील नियामक भारतीय चहा बाेर्डाने केंद्र सरकारकडे ९८८ काेटी रुपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली आहे. चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात ५५ हजार श्रमिक या उद्याेगात सक्रिय आहेत. चहा मळ्यांसमाेर दाेन माेठ्या समस्या आहेत. दार्जिलिंग चहाच्या नावाखाली नेपाळचा स्वस्तात विकला जाणार चहा ही पहिली समस्या आहे. नेपाळमधून माेठ्या प्रमाणात थेट हा चहा भारतीय चहाच्या नावाखाली परदेशात निर्यात केला जाताे. भारतीय उत्पादनाच्या नावाखाली हे बिनबाेभाटपणे सुरू आहे. नेपाळच्या तुलनेत चहा मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे वेतन व नियम कडक आहेत. त्यामुळे बंगालच्या अस्सल दार्जिलिंग चहाचे दर नेपाळच्या चहाच्या तुलनेत जास्त आहेत. दार्जिलिंग चहाच्या एक लेबलमुळे दाेन काेटी चहाची विक्री हाेते. परंतु दार्जिलिंगमध्ये वास्तवात एक काेटी चहाचे उत्पादन हाेते. नेपाळसाेबतचा मुक्त व्यापार करार दार्जिलिंग चहाची तस्करी राेखण्यात अडथळा आहे, असे चहा बाेर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कलिम्पाेंग, दार्जिलिंगच्या चहाला आयजी टॅग दार्जिलिंग चहाला जीआय टॅग लागू आहे. कलिम्पाेंग, दार्जिलिंग येथे ६०० मीटर ते २ हजार मीटरच्या उंचीवर पिकवल्या जाणाऱ्या चहालाच दार्जिलिंगचा चहा असे मानले जाऊ शकते. चहा बाेर्डाने ८७ बागांनाच दार्जिलिंग चहाचा परवाना दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.