आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रम:भिक्षाफेरी, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणीने होणार दासनवमी उत्सव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री समर्थ राम मंदिरात धार्मिक कार्यक्रमाने दासनवमी साजरी करण्यात येते. या वर्षी होणाऱ्या दासनवमीमध्ये धार्मिकतेला सामाजिकतेची जोड दिली आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिराने उत्सव साजरा होणार असल्याची माहिती समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस अॅड. नरेंद्र देव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समर्थनगरातील श्री समर्थ रामदास स्वामी मंदिरात ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या कालावधीत उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने दररोज सायंकाळी ५.३० वाजता कीर्तन, प्रवचन होणार आहे. ‘स्वा. सावरकर’ या विषयावर राजेश्वर पारवेकर यांचे प्रवचन होणार आहे. गीतगायन व नामसाधना विषयावर अरुणा कुलकर्णी प्रवचन करतील. समर्थ रामदासस्वामी समर्थ वाङ्मय विषयावर उदय कुलकर्णी, दासबोधातील क्रमविकासावर पुष्पा प्रभुणे यांचे प्रवचन होईल. भिक्षाफेरीतून अन्नदान, रक्तदान अॅड. देव म्हणाले की, शहरातील विविध भागात सकाळी ७ ते १२ या वेळेत भिक्षाफेरी काढण्यात येणार आहे. मंदिरात दररोज अन्नदान होणार आहे. यासोबतच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...