आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद:बँकेच्या चेअरमनने रोखलेली बंदूक हिसकावून कार पळवली; पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्याने अपघात, दुचाकीस्वार ठार

दौलताबाद /लासूर स्टेशनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन तासांत दोन चालकांना मारहाण करून कार पळवल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. त्यात एका बँकेच्या चेअरमनने रोखलेली बंदूक हिसकावून घेत इनोव्हा कार पळवण्यात आली. सिल्लेगाव ते दौलताबाद पोलिस पाठलागावर असताना चोरांचा स्टिअरिंगवरील ताबा सुटून ३ वाहने एकमेकांवर धडकली. यात चंद्रकांत वसंत बोडखे (४२, रा. खेडी, ता. खुलताबाद) यांचा मृत्यू झाला. एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. देवेंद्र विठ्ठल शिंदे, योगेश कारभारी राजदेव व उमेश कारभारी राजदेव (रा. रामराई फाटा, ता. गंगापूर) अशी चोरांची नावे आहेत.

डोणगावचे रहिवासी केवलसिंग धरमसिंग सुलाने सोलापूरवरून क्वीड कारने (एमएच २० बीव्ही ४२४५) गावाकडे चालले होते. रात्री ९:३०च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या ३ चोरट्यांनी त्यांना रोखून मारहाण केली. त्यांची कार घेऊन ते पळाले. केवलसिंग यांच्या तक्रारीवरून सिल्लेगाव पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तोपर्यंत चोरट्यांनी पळवलेली कार वरझडीजवळ बंद पडली. त्यांनी पाठीमागून येणारी इनोव्हा (एमएच २८ बीएन १८५७) अडवली. यात बँकेचे संचालक सतीश भगवंतदास गुप्ता (चिखली, बुलडाणा) हे दोन सहकाऱ्यांसह होते. गुप्तांनी चौदा जिवंत काडतूस असलेली बंदूक रोखली, पण चोरट्यांनी ती हिसकावून इनोव्हा पळवली. ते औरंगाबादकडे निघाले असताना सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी सोलापूर-धुळे हायवेवर पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी कंपनीतून दुचाकीवर घरी जाणाऱ्या बोडखेंना उडवले. दुचाकी चक्काचूर झाल्याने अपघातस्थळी आणखी एखादे जड वाहन असावे असा पोलिसांचा संशय आहे. मृत पावलेले बोडखे इंड्युरस कंपनीत सुपरवायझर होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी व आई आहे.

बातम्या आणखी आहेत...