आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंती:दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळच्या वाहतुकीत केला बदल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शहरातूनदेखील अनेक भाविक पायी दर्शनासाठी जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी दौलताबाद ते खुलताबाद मार्गातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. ५ ते ६ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल लागू असेल. यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडून धुळे, देवगाव रंगारीकडे जाणारी जड वाहने नगर नाका-एएस क्लब चौक-साजापूर फाटा- करोडी-शरणापूर फाटा-दौलताबाद टी पॉइंट, माळीवाडा, वेरूळ, कसाबखेडा मार्गे पुढे जातील. तर, धुळे देवगाव रंगारीकडून शहरात येणारी जड वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, माळीवाडा, दौलताबाद टी पॉइंट, शरणापूर फाटा, करोडी, साजापूर फाटा, एएस क्लब चौक मार्गे जातील, असे पोलिसांनी कळवले आहे.