आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:विद्यार्थ्याचा धडावेगळा‎ मृतदेह विहिरीत आढळला‎, छत्रपती संभाजीनगरच्या बहुलखेडा शिवारातील धक्कादायक घटना‎

सोयगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील विहिरीत शीर‎ धडा वेगळे झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह‎ कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला. ही‎ घटना शुक्रवारी पहाटे आठ‎ वाजता उघडकीस आली.‎ अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी‎ ‎ (वय 18, रा. कवली, ता.‎ सोयगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

शुक्रवारी‎ पहाटे बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाने‎ (रा.पिंपळगाव हरे ता. पाचोरा) यांना त्यांच्या गट‎ क्र. 138 मध्ये असलेल्या विहिरीत कुजलेल्या‎ अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळून आला.‎ याची माहिती त्यांनी कवलीचे पोलिस पाटील‎ निवृत्ती केंडे व बहुलखेड्याचे पोलिस पाटील‎ चंद्रसिंग राठोड यांना दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शिर गळुन गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

यानंतर पोलिस पाटील‎ यांच्या माहितीवरून सोयगावचे पोलिस‎ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा‎ केल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह‎ नातेवाईकांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी सोयगाव‎ पोलिस ठाण्यात नोंद केली. अधिक तपास पोलिस‎ निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनात‎ जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे आदी करत आहे.‎

1 मेपासून घरातून होता बेपत्ता‎

मृत अविनाश याने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती. अविनाश हा 1 मेपासून घरातून निघून गेलेला होता.‎ त मित्र आणि नातेवाईकांकडून 10 ते 12 दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. त्यानंतर गावाजवळ हीखेडा‎ शिवारात विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना‎ आढळून आल्याची घटना उघडकीस आली.‎ अविनाशच्या मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थित जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.