आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मृत अर्भकाचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके, गारखेड्यातील घटना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस.
  • कचऱ्यात टाकल्यानंतर जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून निर्दयी मातेचा शोध सुरू

गारखेड्यातील चाणक्यपुरीजवळील कचऱ्यात पुरुष जातीचे मृत अर्भक फेकून दिल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. कुत्र्याने बाळाचे लचके ताेडले हाेते. पाेलिसांनी नागरिकांच्या मदतीने हे अर्भक घाटीत दाखल केले.

प्रवीण गाडेकर व ज्ञानेश्वर सोनवणे हे शनिवारी दुपारी दुचाकीने शहानूरवाडीतून सूतगिरणी चौकाकडे जात होेते. तेव्हा अचानक चाणक्यपुरी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ कुत्रे जमलेले दिसले. एका कुत्र्याच्या तोंडात अर्भक असल्याचे पाहून त्यांनी दुचाकी थांबवली. त्यांनी व अासपासच्या नागरिकांनी कुत्र्याला दगड मारल्यानंतर अर्भक टाकून त्याने पळ काढला. जुनाट साडीत गुंडाळून फेकलेले व जळालेल्या अवस्थेतील पुरुष जातीचे अर्भक पाहून अनेकांचा थरकाप उडाला. नागरिकांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती कळवली. त्यानंतर उपनिरीक्षक वसंत शेळके पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हे अर्भक कसे उचलावे कसे, असा प्रश्न पाेलिसांना पडला. नंतर समीर अहमद खान यांनी धाव घेत घरून एक बॉक्स व कापड आणले. खान यांच्यासह प्लंबर असोसिएशनचे ऋषिकेश लोंढे, सतीश बिरारे यांनी अर्भक उचलून कापडात बांधून बॉक्समध्ये ठेवले. पोलिसांच्या गाडीत ते घाटीत रवाना केले. जवाहरनगर पोलिस त्या निर्दयी मातेचा शाेध घेत अाहेत.

कचऱ्यात टाकल्यानंतर जाळण्याचा प्रयत्न
अर्भक कुजण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ते बुधवार ते गुरुवारच्या दरम्यान कचऱ्यात टाकून दिलेले असावे. नाळदेखील तशीच आहे. दोन दिवसांमध्ये अर्भक पूर्णपणे काळे पडले हाेते. कुत्र्यांनी एका बाजूने त्याचे लचके तोडले होते. पाय खाल्ला हाेता. कचऱ्यात टाकल्यानंतर त्याला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अर्भकाची एकूण अवस्था पाहून पाेलिसदेखील हळहळले.

बातम्या आणखी आहेत...