आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विद्यार्थ्यांना आधार अपडेटची अंतिम मुदत 31  डिसेंबरपर्यंत

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरल पोर्टलवर प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार अपडेट झाले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना या सरल पोर्टलसोबत लिंक असतील. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करा. आधार अपडेट न झाल्याने कुणीही विद्यार्थी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्या, अशी सूचना राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांनी केली.

देओल गुरुवारी शहरात आल्यावर त्यांनी खाेडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या आणि एका खासगी शाळेला भेट दिली. पहिलीच्या विद्यार्थ्यांना चित्र वाचन, तिसरीच्या विद्यार्थ्यांना चढता-उतरता क्रम तर सातवीच्या विद्यार्थ्यांकडून जापनीज संवाद म्हणून घेत त्यांनी संवाद साधला. त्यानंतर गारखेडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देओल यांची मुलाखत घेतली. नारेगाव मनपा शाळेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळांच्या तसेच फील्डवरील प्रत्यक्ष अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यांतील २३.३९ लाख (९१.७१ टक्के) विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे, तर २ लाख १५ हजार ४०७ विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार नाही.

बातम्या आणखी आहेत...