आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्परीक्षा:मुक्तच्या पुनर्परीक्षार्थींना 12 नोव्हेंबरपर्यंत मुदत

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत पुनर्परीक्षार्थींना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक, तांत्रिक व सायन्स शाखेच्या पुनर्परीक्षार्थींना प्रती पेपर १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थींसाठी हे शुल्क १३० रुपये असणार आहे. प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा शुल्क प्रतिपेपर ३०० रुपये व विलंब शुल्क १०० रुपये असे शुल्कासह अर्ज दाखल करावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...