आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:प्री-मॅट्रिक अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या वतीने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पहिली ते दहावीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची व नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. शासनस्तरावर अर्जाची पडताळणी करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. एकाच विद्यार्थ्याने दोन अर्ज भरले तर ते दोन्ही बाद केले जातील.

अर्जात नोंदवलेले विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेचे असावे. ही सर्व माहिती www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील, असे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती www.scholarships.gov.in वर मिळेल. अर्जदार ५० टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...