आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:शिष्यवृत्तीसाठी शनिवारपर्यंत मुदत; विद्यार्थ्यांना भारत सरकार‎ शिष्यवृत्ती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित‎ जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार‎ शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी‎ छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व‎ विद्यावेतन देण्यात येते. अकरावी ते पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या‎ विद्यार्थ्यांनी ८ ऑक्टोबरपर्यंत mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नवीन अर्ज सादर करावेत. तर नूतनीकरणास १५ ऑक्टोबरपर्यंत‎ मुदत दिली आहे.

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या‎ नवीन अर्जासाठी १५ ऑक्टोबर तर‎ अर्ज नुतनीकरणासाठी २० ऑक्टोबरपर्यंत‎ कालावधी आहे. तर वरिष्ठ‎ महाविद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रम नवीन विद्यार्थ्यांसाठी ११‎ तर नूतनीकरणासाठी ३१‎ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत दिली.

बातम्या आणखी आहेत...