आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:SEBC प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्जातील बदल करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मधील विविध पदांसाठी भरलेल्या अर्जदारांची प्रतीक्षेच्या वेळापत्रकांची प्रतीक्षा संपलेली नाही. यातील चार परीक्षेसाठी SEBCतून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या अथवा EWS प्रवर्गात अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. अर्जातील बदलासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून विद़यार्थ्यांना १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

कोरोनामुळे MPSC च्या परीक्षांचे वेळापत्रक लांबले. त्याचे निश्चित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याच दरम्यान सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षणाबाबत ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर राज्यशासनाने SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून आरक्षणाचा लाभ याबाबतचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने SEBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जातील प्रवर्ग बदल करण्याबाबतच्या सुचना केल्या. आयोगाने म्हटले आहे, आयोगातर्फे 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती नुसार या प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या किंवा EWS यापैकी एक लाभ घ्यावयाचा आहे. २०२० मध्ये आयोगाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज मागवलेले आहेत. अर्जातील बदलासाठी १५ जानेवारीपर्यंत विकल्प सादर करता येणार आहे. मुदतीत बदल सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त खुला पदावरील निवडीकरिता विचार केला करण्यात येईल असेही आयोगाने म्हटले आहे. आयोगाने अर्जातील बदला बाबतची प्रक्रिया सुरू केली परंतु परीक्षा केंव्हा, त्याचे वेळापत्रक कधी जाहीर केली जाईल याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...