आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम मुदत:शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यास 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु, अद्याप शाळांनी ऑनलाइन माहिती आणि आवेदनपत्र भरलेले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र, ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र आणि नियमित शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत २० डिसेंबर देण्यात आली आहे. तसेच, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २१ ते २५ डिसेंबर, तर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २६ ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...