आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:रायुकाँच्या जिल्हाध्यक्षांवर शस्त्राने जीवघेणा हल्ला ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बिडकीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमाळे यांच्यावर विरोधकांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी बोकूड जळगाव (ता. पैठण) येथे घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात आरोपींविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शनिवारी रात्री १०:३० वाजता विकास लोखंडे यास काही लोक मारहाण करू लागले. त्यामुळे तरमाळे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला केला. हॉटेल हवेलीचे मालक भाऊसाहेब लोखंडे यांनी बिडकीन पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा विकास लोखंडे हॉटेलवर असता अनिकेत अशोक नागे, राजू बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनील रूपचंद खरात व पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकूड जळगाव) यांनी लोखंडी कड्याने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, विकास हा त्यांच्या तावडीतून सुटून घराच्या दिशेने पळत हाेता. या वेळी गावातील मशिदीजवळ आकाश ऊर्फ छक्क्या अशोक नागे, अनिकेत ऊर्फ बंटी अशोक नागे, दिनेश राठोड व राजू बनकर यांनी चारचाकी वाहनाने (एमएच २०/६१०१) येऊन तरमाळे यांना मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...