आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उकळत्या पाण्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:बादलीत पाणी टाकून हीटर लावल्यानंतर घडली हृदयद्रावक घटना, वाळूज भागात हळहळ

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बादलीत हीटर लावून, पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले असताना, घरात खेळत असणारी चार वर्षीय श्रेया राजेश शिंदे ही चिमुरडी उकळत्या पाण्यात पडून गंभीररीत्या भाजल्याची घटना बुधवारी दुपारी वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील कमळापुरात घडली होती. या घटनेनंतर तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज शुक्रवारी (दि. 25) तिची प्राणज्योत मालवली.

वाळूज परिसरातील कमळापूर येथे राहणारे राजेश शिंदे हे मुळ परभणी येथील रहिवासी असून ते अध्या पत्नी, आई-वडील भाऊ व एक मुलगी श्रेया यांच्यासह कमळापुरात राहतात. त्यांची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेल्याने मुलगी श्रेया त्यांच्याजवळच राहत होती.

बुधवारी (दि.२३) दुपारी त्यांना कंपनीत जायचे असल्याने घरात प्लास्टिकच्या बाटलीमध्ये हिटर लावले होते. घरात आई-वडील भाऊ सर्व कुटुंब होते. खेळता खेळता श्रेया पाणी गरम करणाऱ्या हीटर कडे गेली आणि अचानक ती बादलीत पडली. कुटुंबियांनी तातडीने तिला घाटीत रुग्णालयात दाखल केले.

80 ते 90 भाजलेल्या श्रेयाची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज (दि. 25) सकाळी सात वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कारभारी गाडेकर हे करीत आहेत.

थोडे सजग राहूया..

लहान मुलं, खेळकर, निरागस अन् अबोल. अजाणत्या वयात ते अल्लड आणि खोडकरही असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. झोक्याचा फास बसून, झोक्यातून पडून असो की, उकळत्या किंवा थंड पाण्यातही मुलं गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या मुलांवर लक्ष ठेवून अशा दुर्घटना टाळण्यासाठी थोडे सजग राहण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...