आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कळमनुरीत निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा मृत्यू

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथे निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ता.१५ घडली आहे. सुमेध गोमाजी मोगले (४२ ) असे या जवनाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील सुमेध गोमाजी मोगले हे मागील पंधरा वर्षापासून गृहरक्षक दलात कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून ते आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना बंदोबस्तावर होते. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. गुरुवारी ता. १४ सकाळी कळमनुरी येथील तहसील कार्यालयामध्ये निवडणूक बंदोबस्त वाटप करण्याचे वेळी ते हजर होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी मोगले यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्या ठिकाणीही उपचार केल्यानंतर नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात आहे याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत नोंद झाली नव्हती. मयत भोगले यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...