आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे शेतीला पाणी भरण्याच्या कारणावरून दोन जावांच्या कडाक्याच्या भांडणानंतर विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. दरम्यान, १० तास उशिरा शवविच्छेदन करून भावाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला.
खामगाव येथे दोन जावांमध्ये पिकाला पाणी देण्ययावरून वाद सुरू हाेता. ५ फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या विहिरीजवळ वाद सुरू झाला. नंतर दुर्गाबाई बखळे यांनी उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना वाचवण्यासाठी एका तरुणाने पाण्यात उडी मारली. परंतु दुर्गाबाई वाचल्या नाहीत. सपोनि आरती जाधव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सकाळी १० वाजेच्या सुमारास दाखल केला. अशातच दुर्गाबाईच्या माहेरची मंडळी सकाळपासून वडोद पोलिस ठाण्यात महिला आरोपी व तिच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत हाेती. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व फोल ठरत होते.
दुर्गाबाईचे माहेर मंगरूळ हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लाेड मतदारसंघात असल्याने ५ वाजेच्या सुमारास राज्यमंत्री सत्तार यांनी वडोद पोलिस ठाण्याला भेट देऊन सपोनि जाधव यांची भेट घेतली. अपर पोलिस अधीक्षक बन्सोडे, उपविभागिय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी ठाण्याला भेट देऊन प्रथम उत्तरीय तपासणी व नंतर गुन्हा दाखल करू असे ठरले. ७ वाजेच्या जवळपास ९-१० तासांनंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. नंतर दुर्गाबाई बखळे यांचा भाऊ दत्तू कोरडे यांनी वडोद पोलिसांत फिर्याद दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.