आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार बोदडे यांचे निधन:7 हजारांहून अधिक गाणी लिहिली; मुक्ताईनगरमध्ये उद्या अंत्यसंस्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ गीतकार, गायक प्रतापसिंग बोदडे यांचे अल्पश: आजाराने आज शुक्रवारी निधन झाले. त्यांनी 72 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बोदडे यांची फेमस गाणे

बोदडे यांची अनेक गाणी गाजली. त्यात दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर... एक त्या रायगडावर दुसरा चवदार तळ्यावर.. हे प्रसिद्ध गीत त्यांनीच लिहून स्वरबद्ध केले होते. महाकवी वामनदादा कर्डक यांच्यासोबत त्यांनी साथ-संगत केली. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. ख्यातनाम कवी, गायक, कव्वाल, शाहीर अशी त्यांची ख्याती होती.

शेवटच्या श्वासापर्यंत लेखन

आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक आधारवड हरपल्याची भावना संपूर्ण आंबेडकरी बहुजन समाजात आहे. प्रतापसिंग यांनी आत्तापर्यंत 7 हजारांहून अधिक गाणी लिहिली व स्वरबद्ध केली आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.

मुक्ताईनगरमध्ये उद्या अंत्यसंस्कार

प्रतापसिंग बोदडे यांच्यावर उद्या सकाळी 9 वाजता मुक्ताईनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना 15 ऑगस्ट 2022 रोजी लोककवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय बोरडे यांनी बोदडे यांना मृत्यूनंतर जीवनगौरव पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले आहे.

बोदडे यांची अजरामर भीमगीते

  • भीमराज कि बेटी मै तो जयभीमवाली हुं
  • तुझ्या पाऊलखुणा भीमराया
  • थांबा हो थांबा गाडीवान दादा
  • मेरा भीम जबरदस्त है
बातम्या आणखी आहेत...