आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सख्ख्या भावंडाच्या मृत्यूने डोंगरगावावर शोककळा, एक वर्षाची मुलगी अन साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू, कारण अस्पष्ट, विषबाधा झाल्याची शक्यता

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही मृतदेहावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून शिंदे कुटुंबियांच्या हवाली केले.

हदगाव तालुक्यातील कवळी येथे मामाच्या गावी गेलेल्या सख्या भावंडाचा शुक्रवारी ता. २३ मृत्यू झाल्याने डोंगरगाव (ता.कळमनुरी) गावावर शोककळा पसरली आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अमोल शिंदे हे आखाडा बाळापूर येथे टेलरींगचा व्यवसाय करतात. बुधवारी ता. २१ सकाळी त्यांची पत्नी पल्लवी शिंदे ह्या त्यांची दोन मुले आर्यन अमोल शिंदे (साडेतीन वर्ष) व मुलगी आराध्या अमोल शिंदे (१) यांना घेऊन माहेरी कवळी (ता. हदगाव) येेथे गेल्या होत्या. गुरुवारी ता. २२ रात्रीच्या वेळी सर्व जण झोपी गेले. मात्र रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास आराध्या हिस अचानक ठसका लागला. त्यामुळे पल्लवी शिंदे जाग्या झाल्या. त्यांनी आराध्याला पाणी दिले मात्र त्यानंतरही ठसका थांबला नाही. त्यामुळे त्यांनी आर्यन यास माहेरीच ठेऊन आरध्याला सोबत घेत निवघा गाव गाठले. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दवाखाने बंद असल्याने आखाडा बाळापूुर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आराध्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

दरम्यान, आज पहाटे अमोल शिंदे यांनी आराध्याचा मृत्यू झाल्याचा निरोप देऊन मुलगा आर्यन यास डोंगरगाव येथे घेऊन येण्याचा निरोप पल्लवी शिंदे यांच्या माहेरी दिला. त्यांच्या माहेरच्या मंडळींनी आर्यन यास झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आर्यन याचा मृतदेह कवळी येथून आखाडा बाळापूर येथे आणला. त्यानंतर दोन्ही मृतदेहावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून शिंदे कुटुंबियांच्या हवाली केले.

दरम्यान, शिंदे दांम्पत्यांना दोनच आपत्ये होती. दोन्ही भावंडांचा एकाचवेळी मृत्यू झाल्यामुळे शिंदे कुटुंबासह डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही भावंडाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांना विषबाधा झाली असावी असा संशय आहे. तर उत्तरीय तपासणीच्या अहवालामध्ये काहीही स्पष्ट झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...