आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदखलपात्र गुन्हा:जामीन मंजूर होताच आत्महत्या केलेल्या सुनेच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राध्यापक सुनेच्या आत्महत्येत गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताच आरोपींची तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडला. राजाराम महाजन नागलोत (६०) याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दीपक नागलोत (२९) यांनी सात महिन्यांच्या गर्भवती असताना ३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.

त्यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे वडील शांतीलाल जारवाल यांच्या तक्रारीवरून पती दीपकसह (३२) सासरा राजाराम महाजन नागलोत (६०), सासू देविका (५५), नणंद वैशाली (२५, सर्व रा. गजानन कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने ३ मार्च रोजी राजाराम, देविका व वैशाली यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यावर शांतीलाल सायंकाळी पोलिसांना योग्य तपास करण्यासाठी अर्ज देण्यासाठी ठाण्यात गेले होते. त्या वेळी आरोपी राजाराम ठाण्यात होता. शांतीलाल दिसताच त्यांच्याजवळ जात तुला शहरात यायचे नाही असे सांगूनही तू इथे कशाला आला, म्हणत शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...