आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिकाऱ्याने लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील भानकवाडी येथील दोरखडा शिवारात ८ मे रोजी दुपारी चार वाजता घडली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेला व्हिसेरा पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, वनरक्षक बद्रीनाथ परजणे, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, डॉ. अशोक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली बोरघरे, डॉ. आघाव, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे यांनी घटनास्थळीच इन कॅमेरा बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्यावर पिंपळवंडी ( ता.पाटोदा.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापूर्वी दोन बिबट्यांचा झाला मृत्यू
पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी येथे नऊ महिन्यांपूर्वी एका विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. लोकांनी जागरूक राहावे. - सिद्धार्थ सोनवणे, प्राणीमित्र, शिरूर.
सर्वत्र ऊसतोडणी झाल्याने बिबटे दाट झाडीत जागा शोधतात
जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात बिबट्याचा अधिवास आहे. सध्या अनेक ठिकाणी ऊसतोडणी झाली असल्याने लपण्यासाठी बिबटे दाट झाडी असलेली जागा शोधत असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. अशोक काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर.
शिरूर : तालुक्यातील भानकवाडी येथील दोरखडा शिवारात जाळ्यात अडकलेला बिबट्या. बिबट्याचा व्हिसेरा न्यायवैद्यक शाळेला पाठवला
दोरीचा फास बसून गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे दिसते
जाळ्यात अडकलेल्या बिट्याने सुटण्यासाठी धडपड केल्याने त्याला जखमही झाली. परंतु, जाळ्याच्या दोरीचा फास लागल्याने श्वास घेण्यास अडचण होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बिबट्याच्या व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. - डॉ.अंजली बोरघरे, पशु वैद्यकीय अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.