आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कर्जाचा डोंगर वाढतच‎ गेला अन् हतबल शेतकऱ्याने गळफास घेत संपवली जीवनयात्रा ‎

खंडाळा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील‎ शेतकरी बाबूराव वाल्मीक दारवंटे‎ ‎ (४०) यांनी‎ ‎ कर्जाला कंटाळून‎ ‎ गळफास घेऊन‎ ‎ अात्महत्या केली.‎ ‎ ही घटना‎ ‎ कोरडगाव‎ ‎ शिवारातील गट नं‎ ‎ ९७ मध्ये गुरुवारी‎ (४ मे) रात्री उशिरा उघडकीस‎ आली.‎

खंडाळा येथील शेतकरी बाबूराव‎ दारवंटे यांची खंडाळा शिवारात शेती‎ अाहे. परंतु, कायम स्वरुपी पावसाचे‎ प्रमाण कमी अधीक असल्याने त्यांनी‎ ही शेती विकून कोरडगाव शिवारात‎ साडेचार एकर शेती तीन वर्षांपूर्वी‎ खरेदी केली हाेती.

शेती खरेदी‎ करण्यासाठी त्यांनी नॅशनल बँकेकडून‎ तसेच शेतीत उत्पन्न झाले की फेडेल,‎ या आशेवर त्यांनी काही खासगी‎ कर्जदेखील घेतले होते. परंतु, सततची‎ नापिकीमुळे कर्ज फेडने अवघड तर‎ झालेच त्यातच कर्जाचा डोंगर वाढतच‎ हाेता. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून‎ कर्ज कसे फेडावे या चिंतेत हाेते.‎

दरम्यान, त्यांनी काेरडगाव शिवारात‎ गळफास घेऊन आत्महत्या केली.‎ याची माहिती मिळताच शिऊर‎ ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी‎ येऊन पंचनामा केला अाणि मृतदेह‎ शिऊर येथील शासकीय रुग्णालयात‎ दाखल केला. त्यानंतर शवविच्छेदन‎ करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन‎ करण्यात आला. त्यांच्यावर खंडाळा‎ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार‎ करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,‎ दोन मुली, एक मुलगा असा परिवार‎ आहे.‎