आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारी पेपरफुटी टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना परीक्षेला ३० मिनिटे आधीच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर प्रवेशास बंदी घालण्यात आली असल्याचे सूचनापत्र बाेर्डाने जारी केले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे. बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी (तीन मार्च) गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाली आहेत. त्यामुळे मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहापर्यंत व दुपार सत्रात परीक्षार्थींनी अडीचपर्यंत परीक्षा दालनात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाणार नाही, असे मंडळाने म्हटले आहे.
गणिताची पुन्हा परीक्षा नाही गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. त्याचबरोबर संबंधित घटनेबाबत सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.