आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या काळानूसार, ग्रीव्हज कॉटन लिमिटेड कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकलच्या निर्मितीत विशेष लक्ष घातले आहे. ई-व्हेइकल निर्मितीचा प्रकल्प रानीपेट येथे सुरू केला जाणार होता. त्यासाठी तेथील तसेच अन्य शहरातील इंजिन निर्मिती प्रकल्प औरंगाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते. आता 15 जून रोजी झालेल्या बैठकीत कंपनीचे नोंदणी कार्यालय कायमस्वरुपी औरंगाबादेत हलवण्याचा निर्णयावर मुंबईत शिक्कामोर्बत करण्यात आला.
इंजिन, रिटेल आणि ई-व्हेइकलमध्ये आघाडीचे नाव असणारी ग्रीव्हज कॉटन लिमिटेड औरंगाबादमध्ये विस्तार करणार असल्याचे संकेत कंपनीने आधीच दिले आहे. यामुळे वेगवेगळ्या शहरातील इंजिन निर्मितीचे प्रकल्प औरंगाबादेत हलवले जाणार होते. तर तामिळनाडूच्या रानीपेट प्रकल्पाच्या जागेत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा भव्य प्रकल्प उभारणार आहे. औरंगाबादेत विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.“अम्पियर इलेक्ट्रिक’ ही कंपनी सुरू केली आहे. याअंतर्गत ई-स्कूटर बाजारात आणल्या आहेत.
काय करते ग्रीव्हज कॉटन लिमिटेड
1859 मध्ये जेम्स ग्रीव्हज आणि जाॅर्ज कॉटन यांनी सुरू केलेली ही कंपनी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल इंजिन (ऑटोमोटिव्ह इंजिन), जेनसेट, पंपसेट तसेच शेती व बांधकामासाठी लागणारी उपकरणे तयार करते. कंपनीचे पुणे, औरंगाबाद, नोईडा, कोइम्बतूर व चेन्नईच्या रानीपेट येथे प्रकल्प आहेत. औरंगाबादच्या चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीतील प्रकल्पात ऑटोमोेटिव्ह इंजिनची निर्मिती होते.
पुण्यातील जागेचा 320 कोटीत व्यवहार
कंपनीने पुणे-मुंबई महामार्गावरील प्रकल्पातील 27 एकर अतिरिक्त जमीन बांधकाम व्यावसायिक रुणाल डेव्हलपर्सला 320 कोटी रुपयांत विकली आहे. मार्च 2022 पर्यंत तीन टप्प्यात देणी अदा करून व्यवहार पूर्ण केला. आता यातूनच औरंगाबादेत विस्तार होण्याची शक्यता आहे.
शहराला असा होईल फायदा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.