आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे लावा झाडे जगवा:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकसहभागातून 12 हजार वृक्षारोपण, एकुण 50 हजार झाडे लावण्याचा निर्णय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकसहभागातून प्रोझोन मॉल ते कलाग्राम, संभाजी महाराज पुतळा परिसर, कमल तलाव, आरएफ कॉलनी, सातारा परिसर, दमडी महल आणि डिव्हाडर स्पेसमध्ये एकुण 12 हजार वृक्षारोपण करण्यात आले. 26 हजार 800 चे उद्दिष्ट असून प्रत्यक्षात 50 हजार वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी दिली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 9 वाजता प्रोझोन मॉल ते कलाग्राम दोन्ही बाजूने, टिव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर, कमल तलाव, आरएफ कॉलनी, सातारा परिसरातील खुल्ल्या जागेवर आणि दमडी महल, डिव्हडर स्पेस मध्ये वृक्षरोपणास सुरुवात करण्यात आली. दिवसभरात विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, सेवाभावी संस्था, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने एकुण 12 हजार वृक्षांची लागवड करून 50 टक्के उद्दिष्टाची पूर्तता एकाच दिवशी केली.

वड, पिंपळ, उंबर, लिंब, बदाम, गुलमोहर, चाफा, यासह विविध 30 पेक्षा अधिक प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात बीड बायपासला वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल, असेही ते म्हणाले.

स्थळनिहाय वृक्षारोपण

स्थळ वृक्षारोपण

प्रोझोन ते कलाग्राम - 6500

सलीम अली - 1250

कमल तलाव - 500

दमडी महल वाहतूक बेट - 100

आरएफ कॉलनी - 50

सातारा परिसर -100

डिव्हाडर स्पेस व खुल्ल्या जागेत - 3500

असे एकुण - 12 हजार वृक्षारोपण करण्यात आले.

गतवर्षीचे 80 टक्के झाडे जिवंत

गतवर्षी 26 हजार 800 वृक्षारोपणाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात आम्ही 78 हजार वृक्षारोपण केले. त्यापैकी 80 टक्के झाडे जिवंत आहेत. 50 टक्के तर खाम नदी परिसरातच लागवड केली असून वृक्ष चांगले बहरू लागले आहेत, महापालिका औरंगाबादचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले.

वृक्षारोपण काळाची गरज

कोरोनाने आपल्याला चांगला धडा शिकवला आहे. ऑक्सजिनसाठी काय हाल झालेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे शहर व परिसरात वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे नितांत गरजेचे आहे, माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...